तुम्ही कितीही पुस्तके वाचलीत, कितीही चांगले प्रवचन ऐकलेत तरी त्यांचा काही उपयोग होणार नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांचा जीवनात अवलंब करत नाही.
जो पन्नास लोकांवर प्रेम करतो त्याला पन्नास संकटे येतात. जो कोणावरच प्रेम करत नाही, त्याला एकही संकट येत नाही.
जे होऊन गेले त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नये तर वर्तमानात जगले पाहिजे. आनंदाने जगण्याचा हा मार्ग आहे.
आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे, निष्ठा हे सर्वात मोठे नाते आहे.