केळीचा प्रत्येक भाग पौष्टिक आणि आरोग्य फायद्यांनी परिपूर्ण आहे. केळीचे पान खाण्यात उत्तम पचन गुणधर्म असतात. हे फळ पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांचा स्रोत आहे.
केळीची पाने विशेषत: मधुमेहींसाठी फायदेशीर असतात. केळी, केळीची पानं याप्रमाणे केळीचे खोडही तुम्हाला भयंकर रोगापासून वाचवू शकते हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया.
इतकेच नाही तर त्याचे अनेक फायदे आहेत. या केळीच्या खोडामध्ये रस शरीरातील विविध विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतो. त्याचबरोबर हे पचनासही खूप मदत करते.
याशिवाय या केळीच्या झाडाच्या खोडाचा ज्युस आणखी एक मोठा आजार दूर करतो. या ज्युसमध्ये वेलची मिसळून प्यायल्यास मूत्रमार्गाचे अनेक मोठे आजार दूर होतात.
केळीच्या खोडापासून बनवलेल्या ज्युसमध्ये लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास पित्ताशयात खडे होण्याचा धोका टळतो. त्याचबरोबर याचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी होण्यासही मदत होते.
अॅसिडिटीची वारंवार समस्या येत असल्यास, केळीच्या खोडाचा ज्युस प्यावा. यामुळे तुमच्या शरीरातील ऍसिडिक पातळी नियंत्रित करण्यात आणि संतुलन पुनर्संचयित करण्यात मदत होते. हे छातीत जळजळ आणि अस्वस्थता आणि पोटात जळजळ यापासून आराम देते.
जर तुम्ही नियमितपणे हा ज्युस घेतला तर शरीरातील सर्व अतिरिक्त कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. (माहिती आणि फोटो - सुमन साहा)