प्रजनन क्षमतेविषयी बोलताना आपण काय खातो? काय खायला हवं? आणि काय खाणं टाळावं? हे जाणून घेणं खूप महत्वाचं असती. खाली दिलेले पदार्थ हळूहळू तुमच्या फर्टिलिटीवर वाईट परिणाम करतात. पाहा ते कोणते आहेत.
E Times ने दिलेल्या माहितीनुसार, रसायनं वापरून तयार केलेल्या आर्टिफिशियल स्वीटनर्स म्हणजेच कृत्रिम साखरेमुळेही फर्टिलिटी कमी होण्याचा धोका असतो. म्हणूनच तुम्ही कृत्रिम गोडव्यासाठी वनस्पती-आधारित स्वीटनर्स वापरू शकता.
कमी चरबीयुक्त डेअरी प्रॉडक्ट्समध्ये कॅल्शियम चांगल्या बॅक्टेरियासह टेस्टोस्टेरॉन हे एंड्रोजनदेखील असते आणि जास्त प्रमाणात टेस्टोस्टेरॉन तुमचा समतोल बिघडू शकतो. ज्यामुळे तुमची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.
तळलेल्या आणि पौष्टिक नसलेल्या पदार्थांना साधारणपणे ट्रान्स फॅट्स म्हणतात. तुमच्या पुनरुत्पादक अवयवांना आवश्यक पोषक द्रव्ये घेऊन जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना हे पदार्थ नुकसान पोहोचवू शकतात.
तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असाल तर जास्त प्रमाणात पारा असलेले सीफूड खाणे कमी करा. स्वॉर्डफिश, अही टूना, बिगये टूना आणि किंग मॅकरेल यांसारख्या सीफूडमध्ये पाऱ्याचे प्रमाण जास्त असते.
चांगल्या आरोग्यासाठी भाजीपाला खावा. पण ज्या भाज्यांवर जास्त प्रमाणावर पेस्टीसाईड्स वापरलेले असतात, त्या भाज्या गर्भधारणेवर वाईट परिणाम करू शकतात. शक्य असल्यास तुम्ही ऑरगॅनिक भाज्या आणि फळांचा आहारात समावेश करावा.
तांदूळ आणि मैद्यासारख्या स्लो आणि खराब कार्बोहायड्रेटऐवजी आहारात स्लो-बर्निंग किंवा कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जसे की, क्विनोआ आणि गव्हाचे पीठ यांचा समावेश करा. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)