नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांची एक बाजू राजकारण आणि स्वातंत्र्यलढ्याची असेल तर दुसरी बाजू अध्यात्म होती. ते रोज योगा करत असे. त्यांच्या जीवनावर पौगंडावस्थेपासून आध्यात्मिक विचारांचा प्रभाव होता. आझाद हिंद फौजेच्या स्थापनेदरम्यान ते जपानमध्ये असतानाही ते दररोज त्यांच्या खोलीत योगासने आणि ध्यान करत असत. त्यावेळी त्यांना एकांतात राहायला आवडायचे. वास्तविक, ते नेहमीच लोकांच्या गरांड्यात असायचे मात्र, रात्री जेव्हा एकांत मिळायचा ते ध्यानात रमून जायचे.
त्यांना वाचनाची खूप आवड होती. तुरुंगात असताना ते विविध प्रकारची पुस्तके वाचत असत. त्यांना सर्वच विषयात रस होता. विशेषतः, जगभरात काय चालले आहे हे जाणून घेण्यात त्याला खूप रस होता. ते जेवढे वाचायचे तेवढेच लिहायचे आणि सर्व विषयांवर विश्लेषणात्मक लेखही लिहायचे. देशविदेशातील अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले.
सुभाषचंद्र बोस हे माँ कालीचे भक्त होते. त्यांचा तंत्रसाधनेच्या सामर्थ्यावर विश्वास होता असेही म्हणतात. म्यानमारमधील मंडला तुरुंगात असताना त्यांनी तंत्रमंत्राशी संबंधित अनेक पुस्तकेही वाचली होती. लिओनार्ड गार्डन त्यांच्या पुस्तकात म्हणतात की सुभाष यांनी धर्मावर कधीही कोणतेही विधान केले नसले तरी हिंदू धर्म त्यांच्यासाठी भारतीयत्वाचा भाग होता. गार्डनने या पुस्तकात लिहिले की, सुभाषची आई दुर्गा आणि कालीची भक्त होती, त्यामुळे सुभाष यांच्यावरही याचा प्रभाव झाला.