मराठी बातम्या » फोटोगॅलरी » explainer » अमृतपाल सिंग संधू... पंजाबचा नवा जर्नेलसिंग भिंद्रनवाले होतोय? फोटोतून पाहा त्याची संपूर्ण कुंडली

अमृतपाल सिंग संधू... पंजाबचा नवा जर्नेलसिंग भिंद्रनवाले होतोय? फोटोतून पाहा त्याची संपूर्ण कुंडली

PHOTOS Amritpal Singh Biography: सध्या एका व्यक्तीचे नाव भारतात खूप चर्चेत आहे, जो पंजाब पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्यक्तीला 2 वर्षांपूर्वीपर्यंत कोणी ओळखत नव्हते. तो 30 वर्षांचा असून सुमारे 10 वर्षे दुबईत राहून भारतात परतला आहे. अमृतपाल सिंग संधू असे त्याचे नाव असून, त्याची वक्तव्ये, कारनामे आणि वेशभूषा हे सूचित करत आहे की, जर सरकार आणि प्रशासनाने त्याच्यावर लवकरच कठोर पावले उचलली नाहीत तर तो पंजाबचा दुसरा जर्नेल सिंग भिंद्रनवाले होऊ शकतो. ज्या भिंद्रनवालेने खलिस्तानच्या मागणीसाठी पंजाबमध्ये दहशतवादाला खतपाणी घातले. भारत सरकारला ते संपवण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार चालवावे लागले. यातून पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India