बाईपण भारी देवा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत असताना अभिनेत्री वंदना गुप्तेंच्या एका किस्स्याची जोरदार चर्चा होतेय.
सिनेमातील शशी जितकी डॅशिंग आहे तितक्यात खऱ्या आयुष्यात वंदना गुप्ते देखील आहेत. खोटं वाटेल पण वंदना गुप्ते यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात त्यांची गाडी घुसवली होती.
एका मुलाखतीत वंदना गुप्ते यांनी एक किस्सा सांगितला त्या म्हणाल्या, "मी एकदा मुंबईहून पुण्याला जात होते. पुण्यात माझा संध्याकाळी 5 वाजता नाटकाचा प्रयोग होता. नेमका त्याच दिवशी माझा ड्राइव्हर आला होता. म्हणून मी स्टेअरिंग हातात घेतली आणि पुण्याच्या दिशेने निघाले".
वंदना गुप्ते पुढे म्हणाल्या, "मी माझी इनोव्हा गाडी घेऊन पुण्याच्या दिशेने जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेववर मंत्र्यांच्या गाड्या चालल्या होत्या".
"पाच वाजता प्रयोग होता आणि दुपारी 2वाजता एक्सप्रेस वेववर अडकले होते. मागून जोरजोरात हॉन देत होते पण मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जराही मागे पुढे होईना".
"मला नाटकाला पोहोचण्याची घाई होती. पण मंत्र्यांच्या गाड्या मला टेक ओव्हर करून देत नव्हत्या. म्हणून मी माझी गाडी मंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली आणि गाडीत बसलेल्या मंत्र्यांच्या गाडीची काच घ्यायला सांगितली".
"त्या कारमध्ये तेव्हाचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बसले होते. मला यातलं काहीही माहिती नव्हतं. माझा 5 वाजता प्रयोग आहे पण तुमची सिक्युरिटी मला पुढे जाऊ देत नाहीये, असं मी त्यांना सांगितलं".
"त्यावर ते मला म्हणाले, कोण तुम्हाला अडवतंय? मी त्यांना सांगतो तुम्ही जा, असं म्हणत माझा रस्ता मोकळा केला".