झी मराठीवरील 'तू चाल पुढं' मालिकेत अश्विनी वाघमारे आणि तिच्या कुटुंबाचा प्रवास मालिकेतून दाखवण्यात आला आहे.
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे.
मालिकेत अश्विनीनं घरातील सगळ्यांचा विरोध पत्करून मोठ्या हिंमतीनं तिचं ब्युटी पार्लर सुरू केलं आहे.