बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे तब्बू. कर्मशिअल सिनेमांबरोबरच तब्बूने रिअलिस्टिक सिनेमांतूनही तिच्या अभिनयाची ताकद दाखवून दिली. मागील 30वर्षांपासून तब्बू फिल्म इंडस्ट्रीत काम करतेय. 1982मध्ये तिनं बंजर या सिनेमातून आपल्या करिअरला सुरूवात केली.
जवळपास 10 वर्ष ती एका सुपरस्टारच्या प्रेमात होती दोघे लिव्ह इनमध्ये राहत होते. मात्र तरीही त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.
संजय कपूरनंतर तब्बूचं नाव साऊथ अभिनेता अक्किनैनी नागार्जुनबरोबर जोडलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार तब्बू आणि नागार्जुन जवळपास 10 वर्ष रिलेशनमध्ये होते.
ब्बूच्या अफेअरच्या चर्चा आजही बॉलिवूडमध्ये होत असतात. सुरूवातीला तब्बू आणि अभिनेते संजय कपूर यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या.
सिनेमाच्या शुटींग दरम्यान दोघांचं अफेअर होतं मात्र काही महिन्यात त्याच्या नात्याला फुलस्टॉप मिळाला.
संजय कपूरनंतर तब्बूचं नाव साऊथ अभिनेता अक्किनैनी नागार्जुनबरोबर जोडलं गेलं. मीडिया रिपोर्टनुसार तब्बू आणि नागार्जुन जवळपास 10 वर्ष रिलेशनमध्ये होते.
नागार्जुनचं पहिलं लग्न झालं होतं. तरीही तो तब्बूवर प्रेम करत होता. दोघे 10 वर्ष लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते.
पण शेवटपर्यंत नागार्जुनने तब्बू आणि त्याच्या नात्याला नाव देण्यास नकार दिला. याचा तब्बूला खूप त्रास झाला आणि नाराज होऊन ती नागार्जुनपासून वेगळी झाली.
अभिनेत्री तब्बूने आजवर लग्न न करण्यामागे अभिनेता अजय देवगणही महत्त्वाचं कारण असल्याचं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं.
2017मध्ये तब्बूने मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "अजय आणि माझी 25 वर्षांची मैत्री आहे. अजय हा माझा भाऊ समीर आर्याचा शेजारी आणि बेस्ट फ्रेंड होता. समीरमुळे माझी अजयबरोबर ओळख झाली.
तरूणपणी अजय आणि समीर माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. कोणताही मुलगा माझ्याशी बोलायला आला की ते त्याला बाजूला घेऊन धमकी द्यायचे कधीकधी त्याला मारायचेही. दोघेही तेव्हा दबंग होते.
मी आज अजयमुळेच सिंगल आहे. त्या दोघांना आता या गोष्टीची जाणीव असेल असं मला वाटतं. तब्बूच्या या किस्स्यानंतर अजय देवगन देखील खूप हसला होता.