अभिनेत्री स्वरा भास्करनं समाजवादी पार्टीचा नेता फहान अहमदबरोबर लग्न केलं. स्वरानं आधी कोर्ट मॅरेज केल्यानंतर आता 13 मार्चला साग्रसंगीत लग्न केलं.
स्वराचं रिसेप्शन देखील मोठ्या थाटात पार पडला. राजकीय क्षेत्रातील अनेक मंडळींनी रिसेप्शनला हजेरी लावली होती.
दरम्यान स्वराच्या रिसेप्शनचा लुक चर्चेत आला आहे. रिसेप्शनसाठी स्वरानं खास घागरा चोली परिधान केली होती. रिसेप्शनमधील तिच्या मंगळसूत्रा डिझाईननं सर्वांचं लक्ष वेधलं.
इतर बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा स्वराचं मंगळसूत्र वेगळं ठरलं आहे. स्वराच्या मंगळसूत्राचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? पाहूयात.
गुलाबी रंगाच्या घागरामध्ये स्वरा रिसेप्शनला पोहोचली. स्वरानं गोल्डन कलरचं मंगळसूत्र घातलं होतं. साधारण अशा प्रकारचं मंगळसूत्र तेलुगू पद्धतीतं घातलं जातं.
स्वराचे वडील उदय भास्कर हे आंध्र प्रदेशचे आहेत. त्यामुळे अभिनेत्रीनं तिचं लग्न देखील तेलुगू पद्धतीनं केलं.
स्वरानं लग्नात दक्षिण भारतीय मंगळसूत्र घातलं होतं. ज्याला ताली असं म्हटलं जातं. जे सोन्याची चेन किंवा पिवळ्या धाग्यासह गळ्यात घातलं जातं.
स्वरानं घातलेलं मंगळसूत्र तेलुगू ताली चेन डिझाइन म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यात सोन्याच्या चैनीसह छोटे छोटे पेंडल जोडले जातात. या मंगळसूत्राच्या अनेक पारंपरिक डिझाइन्स आहेत.