सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी नेहमीच आपल्याला साध्या सोज्वळ लुकमध्ये दिसत असते. गौरी म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू गौरी आणि गिरीजा यांच्यात खूप मोठा फरक आहे. गौरी जरी काकूबाई असली तरी गिरीजा मात्र वैयक्तिक आयुष्यात खूप मॉर्डन आहे. मालिकेत दररोज साडी, मंगळसूत्र आणि पारंपरिक वेशात असलेल्या गौरीचे खऱ्या आयुष्यातील मॉर्डन फोटो तिनं शेअर केलेत. समुद्र किनाऱ्यावरचे टँक टॉपमधील गिरीजाचे फोटो तिनं शेअर केलेत. गिरीजाचा मॉर्डन अवतार पाहून सगळ्यांचेच डोळे चमकलेत. वेस्टर्न आऊटफिट्समध्ये गिरीजा खूपच स्मार्ट दिसत आहे. गिरीजाच्या फोटोला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.