इन्स्टाग्रामवर 78 मिलियनहून अधिक फॉलोअर्स असणारी अभिनेत्री श्रद्धा कपूरनं तिचा 36वा वाढदिवस साजरा केला.
बॉलिवूडमध्ये अल्पावधीत प्रसिद्धी मिळवणाऱ्या श्रद्धा कपूरवर वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव झाला.
सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी श्रद्धाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरही शुभेच्छांचा पाऊस पडला.
पण श्रद्धाचं काही या शुभेच्छांनी मन भरेना. अभिनेत्री थेट तिच्या चाहत्यांना थोड्या हटक्या शुभेच्छा द्या असं आवाहन केलं.
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या पण काही हटके स्टाइलनं, असं श्रद्धानं म्हणताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर हटके स्टाइलच्या शुभेच्छांचा अक्षरश: वर्षाव केला. श्रद्धानं आवडलेल्या शुभेच्छांना रिप्लाय देखील केला.
एका चाहत्यानं लिहिलं, 'पैदा दिवसाच्या शुभेच्छा'. मराठी कमेंट पाहून श्रद्धानं पटकन त्यावर रिप्लाय केला. 'मराठीमध्ये तर नेहमी एक्स्ट्रा स्पेशल' असं श्रद्धानं म्हटलं.
मराठमोळ्या गोष्टींवर श्रद्धाचं विशेष प्रेम आहे हे सर्वांनाच माहिती आहे. श्रद्धा तिच्या घरी सगळे मराठी सण साजरे करते. तिला उत्तम मराठीही बोलता येतं.