मराठमोळा शिव ठाकरे बिग बॉस 16मध्ये गेल्यानं राष्ट्रीय स्थरावर त्याला ओळख मिळाली. बिग बॉसमध्ये नेमकं त्याचं सिलेक्शन कसं झालं हे शिवनं न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं.
शिव म्हणाला, 'खरंतर बिग बॉससाठी ऑडिशन नसतं. सिलेक्शन असतं. ते लोक स्वत: मोठ्या स्टार्सना फोन करतात. त्या स्टारमध्ये ते डिफरंट पर्सनॅलिटी बघतात. त्यांना मराठी मुलगा हवा होता'.
'आता आपल्याला कोण कॉल करणार नाही. पण मला बिग बॉस मराठीमुळे फेम मिळालं होतं. मी कधीच कामाची वाट पाहत नाही. मी कामासाठी स्वत: समोरच्याला कॉल करतो'.
'बिग बॉसमध्ये पहिले 2-3 वर्ष अनेकांना ऑफर्स येतात. पण ते रिजेक्ट करतात. पण मी त्यांना स्वत: कॉल करायचो. कधी कधी ते फोन उचलायचे नाहीत. अनेक वेळा ते रिजेक्ट करायचे. म्हणायचे नाही होणार'.
'मी अनेक वर्ष प्रयत्न करत होतो. हो नाही हो नाही करत आता कुठे माझा नंबर लागला. आता चॅलेन माझ्याबरोबर जोडलं गेलं आहे. आता समोरून मला कॉल येतात की हा शो करणार का'.
'मी एका छोट्या शहरातून आहे. माझ्या घरी या इंडस्ट्रीतील कोणी नाही. त्यामुळे कामासाठी मला कोणाला कॉल करावा लागतो याचं मला काही वाईट वाटत नाही', असं शिव म्हणाला.