बिग बॉस मराठीमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टच्या कामात बिझी आहे.
नऊवारी साडी, डोक्यावर पदर, मराठमोळा साज आणि उरात महाराजांविषयी अभिमान. तेजस्विनीच्या या नव्या लुकला चाहत्यांची पसंती मिळतेय.
त्याचप्रमाणे तेजस्विनी आणि किरण माने हे देखील एकत्र काम करत असून त्यांची नवी कलाकृती लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.
बिग बॉसमुळे तेजस्विनीला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. दरम्यान तिच्या नव्या फोटोशूटनं पुन्हा लक्ष वेधलंय.
छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणाऱ्या तेजस्विनीचं नवं फोटोशूट तुम्हाला कसं वाटलं? कमेंटमध्ये नक्की कळवा.