अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा 'वेड' मराठी सिनेमा 30 डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.
सिनेमातून अभिनेता रितेश देशमुख पहिल्यांदा दिग्दर्शन करतोय. तर जिनिलियानं सिनेमाची निर्मिती केली आहे.
सिनेमात रितेश जिनिलियाबरोबर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, शुभंकर तावडे, जिया शंकर, आणि सलमान खान हे कलाकार आहेत.
सिनेमानं पहिल्याचं दिवशी लाखोंची दमदार ओपनिंग केली आहे. सिनेमा महाराष्ट्रातील टॉप 5 दमदार ओपनिंग करणाऱ्या यादीत आहे.
'वेड' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाआखी सिनेमाचं 0.65 करोड अडवान्स बुकींग झालं होतं.
ओपनिंग डेला सिनेमानं 3.5 करोडची कमाई केली आहे. 'टाइमपास 2' नंतर ओपनिंग डेला इतकी कमाई करणारा वेड हा पाचवा सिनेमा ठरला आहे.
'सैराट'नं पहिल्या दिवशी 3.6 करोड कमावले होते. तर 'लय भारी'नं 3.1, 'टाइमपास 2' नं 3.75, 'नटसम्राट' 3.5 आणि 'वेड' 3.5 करोडसह पाचव्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. तर 'पावनखिंड' सिनेमानं पहिल्या दिवशी 1.25 करोडची कमाई केली होती.
'वेड' सिनेमाचं संपूर्ण बजेट हे 15 करोड रुपये आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवसात सिनेमात प्रदर्शित झाल्यानं सिनेमाचे सगळे शो हाऊसफुल आहेत.