मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी मायरा मात्र सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
अस्सल मराठमोळ्या वेशात शिवनेरी गडावर मायरानं मोठ्या अभिमानानं भगवा झेंडा फडकवलाय. तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतायत.
हातात महाराजांची मुर्ती, नऊवारी साडी, कपाळी चंद्रकोर, डोई फेटा अशा मराठमोळ्या पेहरावात मायराचे सुंदर फोटो पाहायला मिळत आहेत.