मुरांबा मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. अक्षय आणि रमा यांच्यावर होळीचा रंग चढणार आहे.
पण होळी सारख्या मोठा सण म्हटलं आणि रेवानं यात मिठाचा खडा नाही टाकला असं होणार नाही. पहिल्या होळीचा पहिला रंग अक्षयला रमाला लावायचं ठरवतो.
रेवा देखील रमासारखीच साडी आणि दोन वेण्या घालून रंग खेळण्यासाठी येते आणि तिचा डाव सक्सेस होतो. अक्षय रमा समजून रेवाला रंगा लावतो.
रेवा मनातून खुष होते खरी. मात्र माझ्या प्रेमावर फक्त रमाचा हक्क आहे असं अक्षय तिला ठणकावून सांगतो.
रंगांची मनसोक्त उधळण करून आपापसातले सारे हेवेदावे विसरायला लावणारा सण रमा आणि अक्षयच्या आयुष्यातही नवी सुरूवात घेऊन येणार आहे.