मुकेश अंबानींचा मोठा मुलगा आकाश अंबानी याचा २०१९ मध्ये श्लोका मेहता हिच्याशी विवाह झाला. १९९० मध्ये मुंबईत जन्मलेली श्लोका ही भारतातील दिग्गज हिरे व्यापारी असणाऱ्या रसेल अरुणभाई मेहता यांची मुलगी आहे.
श्लोकाचं प्राथमिक शिक्षण मुंबईत धीरुबाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झालं. त्यानतंर पुढील शिक्षणासाठी ती न्यू जर्सी इथे प्रिन्सटन युनिव्हर्सिटीत शिक्षणासाठी गेली. तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्समधून तिने कायद्याची पदवी घेतली.
श्लोका २०१४ पासून रोजी ब्लू फाउंडेशनची संचालक म्हणून काम करते. रोजी ब्लू फाउंडेशन देशातील सर्वात मोठ्या हिऱ्याच्या कंपन्यांपैकी एक आहे.
व्यवसायाशिवाय ती सामाजिक कार्यातही सहभागी असते. २०१५ मध्ये तिने कनेक्ट फॉर नावाने एनजीओ सुरू केली. या एनजीओमध्ये गरजूंना शिक्षण, भोजण आणि निवासाची सुविधा दिली जाते.
मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा आज पार पडला. राधिका आणि अनंत अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.
अंबानी कुटुंबात नीता अंबानी यांच्यानंतर राधिका ही दुसरी व्यक्ती आहे, जिने भरतनाट्यम नृत्यप्रकारात अरंगेत्रम केलं आहे.
राधिका ही मागील 8 वर्षांपासून गुरू भावना ठाकर यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत होती. जून 2022मध्ये तिनं अरंगेत्रम पूर्ण केलं. राधिका मर्चंट ही शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.
राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. तसंच एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.