विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कांदबरीवरील आधारित चंद्रमुखी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतील उतरला.
अभिनेत्री अमृता खानविलकरनं चंद्रमुखी हे प्रमुख पात्र उत्तमरित्या साकारलं. त्याचप्रमाणे सिनेमात अभिनेता आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, समीर चौघुले यांनीही सिनेमात प्रमुख भूमिका केल्या आहेत.
सिनेमानं बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत नवा रेकॉर्ड बनवला. मुंबईसह महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही चंद्रमुखी सिनेमाचे शो हाऊसफुल्ल झाले.
अभिनेता प्रसाद ओकच्या आयुष्यातील चंद्रमुखी हा सिनेमा फार महत्त्वाचा ठरला. सिनेमासाठी प्रसादनं विशेष मेहनत घेतली होती.
सिनेमाची सुंदर कथा, त्याचप्रमाणे सिनेमाचे संवाद, गुरू ठाकूर यांनी लिहिलेली सुंदर गाणी आणि त्याला संगीतकार अजय अतुल यांचं मिळालेलं सर्वोत्तम संगीतानं सिनेमा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.
सिनेमातील चंद्रा या गाण्यानं नवा रेकॉर्ड तयार केला. आजही सोशल मीडियावर चंद्रा या गाण्याची प्रेक्षकांना भुरळ आहे.
प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या चंद्राचा आता नवा प्रवास सुरू झाला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.
चंद्राचा नवा प्रवास सुरू झालाय तो म्हणजे नामांकनाचा. अनेक पुरस्कारांसाठी चंद्रमुखी सिनेमाला नामांकन मिळालं आहे. सिनेमाला मिळालेल्या नामांकनामुळे कलाकार आणि सिनेमाची संपूर्ण टीम भरपूर आनंदी आहे.