advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Manasi Naik: मानसी नाईकने चाहत्यांना दिली गुड न्यूज; लवकरच करणार नवी सुरुवात

Manasi Naik: मानसी नाईकने चाहत्यांना दिली गुड न्यूज; लवकरच करणार नवी सुरुवात

मागच्या वर्षात पती प्रदीप खरेरा सोबत घटस्फोट घेतल्याने मानसी नाईक चांगलीच चर्चेत आली. या सगळ्यांतून ती लवकरच बाहेर येऊन जोमात कामाला लागली. आता तिने चाहत्यांसोबत एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे.

01
आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.

आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.

advertisement
02
आजवर तिने नृत्यासहीतच अनेक मालिका आणि चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत.

03
 मानसी नाईकने काल तिचा वाढदिवस साजरा केला. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. आता यानिमित्ताने तिने तिच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

04
 मानसी नाईक ही लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे.

05
मानसी नाईकच्या पहिल्या हिंदी चित्रपटाचे नाव 'सिफर' असे आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन विनोद वैद्य यांनी केले आहे.

06
मानसी नाईकने नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ती म्हणाली, “मला स्वत:ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझा पहिला हिंदी चित्रपट. एक नवीन सुरुवात – ‘सिफर’. माझा पहिला हिंदी वेब शो. यंदाचा माझा वाढदिवस अधिक स्पेशल झाला. शुभेच्छा असू द्या.”

07
“एक नवी सुरुवात. माझ्या वाढदिवशीच माझ्या पहिल्या सिफर या हिंदी चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित. तुमच्या आशीर्वाद आणि पाठिंब्याची खूप गरज आहे”, असेही तिने यात म्हटले आहे.

08
आता तिला चाहते शुभेच्छा देत आहेत. तसेच तिला या नवीन भूमिकेत पाहायला ते उत्सुक आहेत.

  • FIRST PUBLISHED :
  • आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक.

    MORE
    GALLERIES