महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर घराघरात पोहोचली. आपल्या अभिनयानं आणि कॉमेडीच्या टायमिंगनं रसिकानं प्रेक्षकांची मनं जिंकली. दिल दोस्ती दुनियादारी, फ्रेशर्स सारख्या मालिकेतूनही रसिकानं काम केलं. कोकणातील पोरगी रसिकानं 2018मध्ये अनिरुद्ध शिंदेबरोबर लग्न केलं. रसिकाचा नवरा देखील अभिनय क्षेत्राशी निगडित असून तो प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. रसिका आणि अनिरुद्ध 10 वर्ष रिलेशनमध्ये होते. कॉलेजमध्ये असताना दोघांचं नात जुळलं होतं. रसिकाचा नवरा अनिरुद्ध शिंदेने 'का रे दुरावा', 'फ्रेशर्स' सारख्या प्रसिद्ध मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे. फ्रेशर्स या मालिकेत रसिकाने देखील महत्त्वाची भूमिका केली होती.