बॉलीवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित हिनं डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
१९९९ मध्ये माधुरी दीक्षित हिनं डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर माधुरीने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि विदेशात सेटल झाली.
पण माधुरी दीक्षितचे वैवाहिक जीवन वाटते तितके आनंदी नव्हते. एका डॉक्टरशी लग्न केल्यानंतर तिला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला.
नुकतेच माधुरी दीक्षितने पती श्रीराम नेने यांच्या यूट्यूब चॅनलवर तिच्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितले आहे.
एक डॉक्टरची पत्नी असल्यामुळे हा काळ तिच्यासाठी किती कठीण गेला आहे हे सांगितले. यावेळी माधुरी दीक्षित म्हणाली, वेळ मिळत नसल्यामुळे खूप अवघड होते, कधी मॉर्निंग शेड्यूल, कधी नाइट शेड्यूल... तर कधी दिवसभर फोनवर व्यस्त असायचे.'
माधुरी दीक्षित आपली व्यथा मांडताना पुढे म्हणाली, हे खरंच खूप अवघड होतं कारण ती वेळ होती जेव्हा ते तिथे नव्हता आणि मी नेहमी मुलांसोबत असायचे, त्यांना शाळेत घेऊन जावं लागायचं. या सगळ्या गोष्टी आणि हो टायमिंग हा सुद्धा खूप मोठा मुद्दा होता.'
ती नेनेंना संबोधत पुढे म्हणाली, 'जेव्हा जेव्हा आपल्या घरात काही स्पेशल असायचे तेव्हा तू आमच्या सोबत नव्हतास, कारण त्या काळात तू दवाखान्यात दुसर्याला मदत करत होतास. जेव्हा मी आजारी होते, तेव्हा तू दुसऱ्याची काळजी घेत होतास. या सर्व गोष्टी खूप कठीण होत्या.'
माधुरी दीक्षित पुढे म्हणाली, पण या असं असूनही मला कायम तुझा अभिमान वाटतो, जसं तू नेहमीच रूग्णांसाठी उभा राहायचास, त्यांच्या आयुष्यासाठी लढायचास, या गोष्टींनी माझे मन जिंकले. तु खूप छान व्यक्ती आहेस.
यावर डॉ.नेने म्हणाले कि, 'आम्ही दोघांनीही वैवाहिक जीवनात एकमेकांना साथ दिली आहे. मुलांसाठीही नेहमीच एकत्र उभे राहिलो. आपण आयुष्यात जे काही करतो ते कुटुंबाच्या भल्यासाठीच करतो.'