बाईपण भारी देव या सिनेमा रिलीजच्या केवळ 5 दिवसात तब्बल 6 कोटींची कमाई केली आहे. 2023मध्ये ओपनिंगला एवढी मोठी कमाई करणारा हा पहिला मराठी सिनेमा ठरला आहे.
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासाठी हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आहे. पोस्ट शेअर करत त्यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार देखील मानले आहेत.
या सगळ्यात चाहत्यांना एक प्रश्न सतावतोय तो म्हणजे केदार शिंदेची लेक कुठे आहे? सना शिंदे हे महाराष्ट्र शाहीर सिनेमात प्रमुख भूमिकेत होती. त्यानंतर बाईपण भारी देवा सिनेमासाठी तिनं असिस्टंट डायरेक्शन म्हणून काम केलं.
पण रिलीजच्या वेळी सना कुठेही दिसली नाही. सिनेमाच्या प्रमोशनमध्ये देखील तिची कुठेच हजेरी पाहायला मिळाली नाही.
एकीकडे वडिलांच्या सिनेमाला इतकं मोठं यश मिळत असताना दुसरीकडे सना ही अमेरिकेत असल्याचं कळतंय. सनाने तिच्या सोशल मीडियावर अमेरिकेतील शिकागो शहरातील फोटो शेअर केलेत.
महाराष्ट्र शाहीर सिनेमानंतर सना अचानक शिकागोला का गेली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण तिथून बाईपण भारी देवा सिनेमाशी निगडीत पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतेय.