मराठीतील अनेक अभिनेते आज एक उत्तम वडील म्हणून सुद्धा जगात वावरत आहेत. त्यांच्या मुलांना तुम्ही ओळखता का?
श्रेयस तळपदे सध्या यशवर्धनच्या भूमिकेत छोट्या परीचा बाबा म्हणून सगळी जबाबदरी नीट पार पाडत आहे. पण खऱ्या आयुष्यात सुद्धा त्याला आद्या नावाची गोड मुलगी आहे.
खासदार दौलतराव अर्थात अभिनेता आदिनाथ कोठारेच्या मुलीला तर सगळेच ओळखतात. जिजा आणि डॅडीचा खास संवाद सुद्धा आदिनाथ अनेकदा पोस्ट करताना दिसतो
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी सुद्धा अगदी नवीनच 'बाप'माणूस झाला आहे. विहा या त्याच्या गोड मुलीचे फोटो आणि गोंडस विडिओ तो कायम शेअर करत असतो.
अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक सुद्धा मयंक आणि सार्थक अशा दोन मुलांचा वडील आहे. त्याची दोन्ही मुलं शिकून आता स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत.
प्रसिद्ध गायक आणि अभिनेता राहुल देशपांडेच्या मुलीबद्दल तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. लॉकडाऊनमध्ये त्यांचे अनेक व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झाले होते.
वागले की दुनिया मालिकेत दोन मुलांचा वडील दाखवलेला अभिनेता सुमीत राघवन खऱ्या आयुष्यातसुद्धा दोन मुलांचा बाप आहे. नीरद आणि दिया अशी दोन मुलं त्याला आहेत.
अभिनेता पुष्कर जोग सुद्धा एक कूल डॅडी आहे. त्याची मुलगी फेलिशा सोबत तो कायमच धमाल करताना दिसतो. या सर्व अभिनेत्यांना फादर्स डे च्या शुभेच्छा (Happy Fathers Day) न्यूज18लोकमत कडून.