बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारे शरीर, बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन, स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेऊन, मुलांसाठी झटणारं अंतःकरण, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो, डोनेशन साठी उधार आणतो, वेळ पडली तर हातापाया पडतो, तो आपला बाप असतो, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचं नाव माझ्या नावापुढे जोडल्याचा अभिमान आहे, कोणीही कधीही तुमची जागा नाही घेऊ शकणार, माझ्या प्रत्येक कामात विचारात तुम्हाला घेऊन आजही मी ठाम आहे, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी चार हात करणाऱ्या व्यक्तीस बाबा म्हणतात, मी खूपच भाग्यवान आहे की, मला तुमची साथ लाभली, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही कितीही मोठे झाला तरीही, असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही मोठा माणूस म्हणूनच पाहता, तो म्हणजे असतो बाबा, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल, पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात, फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!