देवमाणूस या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली दिव्या सिंग म्हणजेच अभिनेत्री नेहा खान सध्या गणेश चतुर्थी साजरी करताना दिसत आहे. पाहा तिचे फोटो.
नेहाला देवमाणूस मालिकेनंतर मोठी प्रसिद्धी मिळाली होती. त्यात तिने इन्सपेक्टर दिव्याची भूमिका साकारली होती.
मालिकेने मागील महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंर प्रेक्षक मालिकेला फार मिस करत आहेत.
देवमाणूस मालिकेने निरोप घेतल्यानंतर प्रेक्षकांना आता मालिकेचा दुसरा भाग येणार का याची उत्सुकता आहे. दरम्यान दुसऱ्या भागाची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.