चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आणि विनोदाचं कमाल टायमिंग असलेला अभिनेता कुशल बद्रिके.
कुशल बद्रिकेच्या अभिनयाच्या प्रवासात कुटुंबाबरोबरच त्याच्या पत्नीचा म्हणजेच सुनयनाचा देखील महत्त्वाचा वाटा आहे.
पण तुम्हाला माहिती आहे का? कुशलची बायको त्याच्यापेक्षा टॅलेंटेड आहे. कुशलप्रमाणेच ती देखील कलाकार आहे.
तिनं कथ्थकचं पदवीधर शिक्षण घेतलं आहे. कथ्थकमध्ये विशारद आणि अलंकार अशी पदवी तिनं संपादन केली आहे.
सुनयना अनेक कार्यक्रमात तिचं नृत्य सादरिकरण सादर करत असते. नुकत्याच झालेल्या NMAC यांच्या भव्य कार्यक्रमात तिनं भाग घेतला होता.