तारक मेहता फेम बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या फारच चर्चेत आहे. मालिकेतील टपू म्हणजेच अभिनेता राज अनादकतसोबत तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. पण याआधीही ती एका अफेअरमुळे चर्चेत होती. पाहा काय होतं प्रकरण. तारक मेहता फेम बबिता म्हणजेच अभिनेत्री मुनमुन दत्ता सध्या फारच चर्चेत आहे. मालिकेतील टपू म्हणजेच अभिनेता राज अनादकतसोबत तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. पण याआधीही ती एका अफेअरमुळे चर्चेत होती. पाहा काय होतं प्रकरण.
अभिनेता राज अंदकत याला ती सध्या डेट करत आहे. अशी माहिती समोर आली आहे. राज आणि मुनमुनमध्ये वयाचा मोठा फरक असल्याने दोघेही सध्या चर्चेत आहेत. राज २४ वर्षांचा आहे. तर मुनमुन त्याच्यापेक्षा ९ वर्षांनी मोठी आहे.
दरम्यान मुनमुन आणि राज यांच्यातील हे अफेअर आताच नाही तर अनेक दिवसांपासून सुरू आहे. मालिकेच्या सेटवरील सगळ्यांनाच याची खबर देखील आहे.
ही गोष्ट २००८ ची आहे. जेव्हा ते दोघेही एकमेकांना डेट करत होते. पण अरमाच्या रागीट स्वभावामुळे त्याचं हे नातं टिकू शकलं नव्हतं.
व्हॅलेन्टाइन्स डेच्या दिवशी दोघांमध्ये मोठं भांडण झालं होतं. तर त्याआधीही अनेकदा त्यांच्यात विवाद झाले होते.
तारक मेहता मालिकेनंतर मुनमुनला मोठी प्रसिद्धी मिळाली. नुकतीच ती मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा कामावर रुजू झाली आहे.
मालिकेतील सध्या अनेक सुरूवातीच्या कलाकांरानी मालिका सोडली. मात्र अनेक कलाकार हे अजूनही आहेत. त्यातीलच एक म्हणजे मुनमुन दत्ता देखील सुरूवातीपासून मालिकेत आहे.