अनुष्का शर्मा या लेटेस्ट फोटोंमुळं चर्चेत, चाहत्यांसह सेलिब्रिटीही देतायत प्रतिक्रिया, पाहा PHOTOS
Anushka Sharma photos : अनुष्का शर्माने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात तिची हटके शैली चाहत्यांना आणि सेलिब्रिटींना वेड लावत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो तिचा पती विराट कोहलीने क्लिक केले असल्याचा अंदाज अनेक चाहते वर्तवत आहेत. पाहा Photos
सध्या अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत दक्षिण आफ्रिकेत आहे, जिथे भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला आहे. अनुष्काने तिथले तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. अनुष्काचा आकर्षक स्टाइलने लोकांना वेड लावलं आहे.
2/ 8
अनुष्काने या फोटोमध्ये तपकिरी जॉगर्सच्या जोडीसह एक सैल पांढरा टी-शर्ट परिधान केलेला आहे.
3/ 8
तिनं शेयर केलेल्या सर्व फोटोंमध्ये ती हसत आहे. उन्हात आणि सावलीत उभं राहून अनुष्कानं पोझ दिल्या आहेत. तिनं फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'मैं एक लाइट कैचर हूं.' सोबत एक पिवळा हार्ट इमोजी देखील शेअर केलेला आहे.
4/ 8
अनुष्काच्या या फोटोंवर अभिनेता अर्जुन कपूरला ही प्रतिक्रिया द्यायचा मोह आवरलेला नाही. त्यानं या फोटोंवर रिएक्ट होताना 'टॅलेंटेड गर्ल' अशी कमेंट केली आहे.
5/ 8
अनुष्काने 7 तासांपूर्वी हा फोटो शेअर केला आहे, ज्यावर 11 लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत. त्याचबरोबर अनेक चाहत्यांना असं वाटत आहे की हे फोटो विराट कोहलीनं काढलेले असावे.
6/ 8
अनुष्काच्या फोटोवर एका यूजरने लिहिले, 'मिस्टर किंगने क्लिक केलेले फोटो. दुसरा वापरकर्ता लिहितो, 'तुमचा नवरा खरोखरच चांगला फोटोग्राफर आहे.
7/ 8
विराट यापूर्वी एका जाहिरातीत अनुष्काचा फोटोग्राफर बनला होता. व्हिडिओमध्ये अनुष्का पोज देताना दिसत आहे आणि विराट तिचा फोटो क्लिक करताना दिसत आहे.
8/ 8
अनुष्काने 2008 मध्ये 'रब ने बना दी जोडी' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिला चित्रपटसृष्टीत 13 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झिरो' चित्रपटात अनुष्का शेवटच्या वेळेस दिसली होती.