उद्योगपती आणि रिलायन्स कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचा नुकतंच राधिका मर्चंटसोबत साखरपुडा पार पडला होता.
अनंत आणि राधिकाने आधी साखरपुडा करत सर्वानांच सुखद धक्का दिला होता. अनंत आणि राधिकाच्या विविध कार्यक्रमांना बॉलिवूड,बिझनेस आणि पॉलिटिक्स क्षेत्रातील विविध दिग्गज उपस्थित होते.राधिका आणि अनंतची लव्हस्टोरी फारच हटके आहे. ते दोघे अगदी बालपणापासून एकमेकांना ओळखत होते. मात्र काही वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत.