मुंबई, 18 जानेवारी- रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन-उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी लवकरच धाकटया सुनेचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वीच मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा शाही थाटामाटात पार पडला होता. त्यांनंतर त्यांचं लग्न कधी असणार? अशी चर्चा सुरु होती. दरम्यान आता अंबानी कुटुंबात लगीनघाई सुरु झालेली दिसून येत आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची जोरदार सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल व्हायला सुरुवात झाली आहे. यामध्ये मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची होणारी धाकटी सून फारच सुंदर दिसून येत आहे. यामध्ये राधिकाने गुलाबी रंगाचा हटके डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. सोबतच राधिकाने सुंदर अशी डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे. या लुकमध्ये राधिकाचं सौंदर्य अगदी खुलून गेलं आहे. Kl Rahul-Athiya Shetty Wedding: केएल राहुल-आथियाच्या लग्नाची जय्यत तयारी; विद्युत रोषणाईने झळाळला पाली हिल्स बंगला राधिकाचे मेहंदी सोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये राधिकाच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढण्यात आली आहे. राधिका आपला मेहंदी फंक्शन पुरेपूर एन्जॉय करताना दिसून येत आहे. राधिकाने आपल्या संगीत सोहळ्यात जबरदस्त डान्स परफॉर्मन्ससुद्धा केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. सोबतच मेहंदी आणि संगीत सोहळ्यासाठी करण्यात आलेली आलिशान सजावट डोळे दिपवून टाकणारी आहे.
राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी अनेक वर्षांपासून एकमेकांना चांगल्याप्रकारे ओळखतात. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. अशातच त्यांनी काही दिवसांपूर्वी परीकथे प्रमाणे थाटात आपला साखरपुडा पार पाडला होता. या पार्टीमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते. शिवाय उद्योग आणि विविध क्षेत्रातील लोकसुद्धा उपस्थित होते. राधिका एक उत्तम नृत्यांगना आहे. अंबानी कुटुंबात नीता अंबानी यांच्यानंतर राधिका ही दुसरी व्यक्ती आहे, जिने भरतनाट्यम नृत्यप्रकारात अरंगेत्रम केलं आहे.
कोण आहे अंबानी कुटुंबाची होणारी सून राधिका? राधिका ही मागील 8 वर्षांपासून गुरू भावना ठाकर यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत होती. जून 2022मध्ये तिनं अरंगेत्रम पूर्ण केलं. अंबानींच्या घराची होणारी धाकटी सून राधिका मर्चंट ही शैला आणि वीरेन मर्चंट यांची मुलगी आहे.राधिकानं न्यूयॉर्क विद्यापीठाची पदवी संपादन केली आहे. तसंच एनकोर हेल्थकेअरच्या बोर्डावर संचालक म्हणून काम करते.