आई कुठे काय करते या मालिकेच्या युनिक नावाबरोबरचं अरुंधती हे नाव देखील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं.
आज अरुंधती या पात्रानं मधुराणीला अभिनय क्षेत्रात नवी ओळख दिली असली तरी पहिल्यांदा मात्र मधुराणीनं हे पात्र साकारण्यास नकार दिला होता.
मालिकेत अरुंधती ही तिन मोठ्या मुलांची आई दाखवण्यात आली आहे. तर प्रत्यक्ष मधुराणीला 7 वर्षांची मुलगी आहे.
7 वर्षांच्या मुलीची आई डायरेक्ट 25 वर्षांच्या मुलांची आई वाटणार नाही, त्यामुळे मधुराणीनं अरुंधती या व्यक्तिरेखेसाठी नकार दिला होता.
परंतु मालिकेच्या निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी आणि मेकअप आर्टिस्टनं मधुराणीचा लुक चेंज केला आणि अरुंधती ही व्यक्तिरेखा उभी केली.
अरुंधती ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी नकार देणारी मधुराणी आज अरुंधतीमुळेच महाराष्ट्राच्या घराघरातील लाडकी आई झाली आहे.