निरंजन सोशल मीडियावर फिटनेसचे फारचे व्हिडीओ किंवा फोटो शेअर करत नसला तरी त्याचं दिवसाचं फिटनेसचं प्लानिंग ठरलेलं असतं.
दररोज 12-15 तास शुटींग सुरू असतं. मालिकेचं शुटींग झाल्यानंतर निरंजन पुन्हा एकदा रात्री जिमला जातो.
त्याच्या या शिस्तीचा त्याच्या कोचला देखील हेवा वाटला आहे. "एखादा माणूस इतका फिटनेस फ्रिक असता असू शकतो? सगळ्या गोष्टी मॅनेज कशा करायच्या हे निरंजन कडून शिकणं खूप गरजेचं आहे", असं त्याच्या फिटनेस कोचनं म्हटलं आहे.