Vaccine म्हणजे काय? जाणून घ्या कोरोनाची लस कसं काम करते ?
संपूर्ण देश कोरोनाशी (Coronavirus) लढा देत आहे. कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. याच काळात कोरोना लसीकरण सुरु झाल्यामुळे दिलासा मिळालेला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी कोरोना व्हॅक्सीन प्रभावीपणे काम करतं. पण नेमकं व्हॅक्सीन घेतल्यावर ते शरीरात कसं काम करतं याची माहिती घेणं आवश्यक आहे.
|
1/ 7
कोरोना लस हा कोरोनापासून वाचण्याचा प्रभावी उपाय आहे. कोव्हिडपासून वाचण्यासाठी जगभरात काही लसी विकसित करण्यात आल्या आहेत. व्हॅक्सिन घेतल्यावर शरीरात कोणत्या प्रकारे काम करते याची माहितीही घेऊ या.
2/ 7
शरीवर जेव्हा कोणत्याही व्हायरसचा हल्ला होतो. तेव्हा आपलं शरीर त्याला प्रतिकार करायाला सुरुवात करतं. आपल्या शरीराची इम्यून सिस्टीम एक्टीव्ह होते. व्हायरसने शरीरावर हल्ला केल्याचा संदेश शरीरात पाठवला जातो.
3/ 7
जगभरात व्हॅक्सीन 3 प्रकारे दिलं जातं. इंजेक्शन, तोंडातून काही ड्रॉप दिले जातात किंवा त्वचेवर छोटी जखम करुन. लसीकरणानंतर शरीर किटाणूंशी लढणारे जीवाणू तयार करायला सुरु करतं.
4/ 7
काही लसींमध्ये त्याच विशीष्ठ रोगाचा व्हायरस, जीवाणू किंवा बॅक्टरिया आसतात. इतर काही प्रकारच्या लसींमध्ये रासायनिकरित्या तयार केलेले विष असते. हे विष रोग निर्माण करणाऱ्या जंतूद्वारे तयार केले जाते.
5/ 7
तिसऱ्या प्रकारच्या लसीमध्ये जिवंत विषाणूंचा समावेश असतो, जो रोगास कारणीभूत असलेल्या विषाणूशी संबंधित आहे पण, तेच विषाणू शरीरातल्या सैन्याप्रमाणे, बाहेरून आक्रमण करणाऱ्या व्हायरसवर हल्ला करतात.
6/ 7
जगातील सर्व आजारांशी लढा देण्यासाठी लसी तयार करण्यात आल्या आहेत. काही सर्व रोग असे आहेत ज्यांची साथ जगात पसरली आणि मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली.
7/ 7
परंतु आता त्याच रोगांवर तयार करण्यात आलेल्या लसी लोकांना त्या आजारांपासून वाचवतात. या लसी आजारांपासून संरक्षण प्रदान करतात, तर काही लसी एका विशिष्ट काळानंतर बऱ्याचदा पुन्हापुन्हा घ्याव्या लागतात.