मालिकेच्या या नव्या ट्विस्टमुळे इंद्रा दीपूच्या नात्यात पुन्हा एकदा दुरावा येणार आहे. इंद्राची खरी ओळख देशपांडे सरांसमोर आल्यानं ते इंद्रा-दीपूचं नात कायमचं तोडण्याचा निर्णय घेणार आहेत. इंद्रा-दीपू यांच्या प्रेमाची गाडी पुन्हा रुळावर येत असताना ते पुन्हा एकदा वेगळे होणार आहेत. मालिकेचा प्रोमो पाहून इंद्रा आणि दीपूला मारण्यासाठी गुंड कोणी पाठवले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ती कार्तिक आणि सानिकाची नवी खेळी असणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. इंद्राच सत्य समोर आल्यानं देशपांडे सर त्याच्याबरोबर असलेले सगळे संबंध तोडणार आहेत. शिवाय आता इंद्राच्या आईला जयश्रीला देखील इंद्रा गुंड असल्याचं कळणार आहे. त्यामुळे इंद्रासाठी हे सगळं सांभाळणं फार कठीण होणार आहे. इंद्रा देशपांडे सरांना आणि जयश्रीला त्याची बाजू समजावू शकणार का? इंद्राचं प्रेम त्याला परत मिळणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी मालिकेचे पुढील भाग पाहणं महत्त्वाचं ठरेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi actress, Marathi entertainment, Tv actor, Tv actress, Tv celebrities, TV serials, Zee Marathi, Zee marathi serial