मुंबई, 16 जून: अनिरुद्धशी घटस्फोट घेऊन अरुंधतीनं
( Aniruddha - Arundhati) तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. आयुष्यात राहून गेलेल्या सगळ्या गोष्टी ती पूर्ण करू लागली आहे. अरुंधतीनं तिचं गाण्याचं स्वप्न पूर्ण केलं. आशुतोषच्या मदतीनं अरुंधतीची दोन गाणी गायली. अरुंधती आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. या सगळ्यात तिचं एक स्वप्न मात्र अर्धवट राहिलं ते म्हणजे तिचं शिक्षण. अरुंधतीला शिक्षणाची आवड होती मात्र घर, संसार, मुलं यांच्यात तिचं स्वप्न अधूरं राहिलं. अरुंधतीचं अर्धवट स्वप्न मात्र ती आता पूर्ण करणार असून तिनं कॉलेजमध्ये अँडमिशन (
Arundhati College Admission) घेतली आहे. गेल्या काही भागांमध्ये आपण पाहिलं असेल की अरुंधती ईशासमोर तिच्या कॉलेजमधील अँडमिशनविषयीची इच्छा बालून दाखवते पण सगळेच तिला विरोध करतात. मात्र आता इशाचं तोंड बंद करुन अरुंधतीनं कॉलेजमध्ये अँडमिशन घेतलं आहे.
आई कुठे काय करते
( Aai Kuthe Kay Karte) मालिकेच्या येत्या भागात आपण पाहणार आहोत की, ईशाचं तोंड बंद करुन अरुंधती थेट कॉलेजमध्ये अँडमिशन घेण्यासाठी जाते. तिथे ती प्रोफेसर मॅडमशी बोलते. तेव्हा अरुंधती तिची 'अरुंधती जोगळेकर' अशी नवी ओळख करुन देते. मला आता माझी स्वप्न पूर्ण करायची आहे. मला अँडमिशन घ्यायचं आहे असं सांगेत. त्यावर प्रोफेसर तिला शिक्षणाची पद्धत बदलली आहे, तुम्हाला जमेल का? तुम्ही करस्पॉन्डंट पद्धतीनं शिकता येईल? असंही सांगतात. पण अरुंधती मला कॉलेजमध्ये येऊन शिकायचं आहे. इथे आले तर गोष्टी आधिक चांगल्या पद्धतीनं कळतील, असं सांगते.
मालिकेचं कथानक सध्या अनेक अँगलनं पुढे जात आहे. एकीकडे अरुंधती आशुतोष यांच्यात मैत्रीचं नात खुलतंय तर दुसरीकडे अनिरुद्धला अरुंधतीची ओढ लागल्यानं तो संजनापासून घटस्फोटाची मागणी करतोय. त्याचप्रमाणे ईशा आणि साहिल यांच्या ब्रेकअपमुळे ईशा पुन्हा एकदा एकटी पडली आहे. अभी आणि अनघा आई बाबा होणार आहेत. तर मालिकेत आता सुलू मावशी आणि राजा भाऊंची एंट्री होणार आहे. या सगळ्यात अरुंधती कॉलेजला जात असल्यानं मालिकेचं संपूर्ण कथानक वेगळं वळणं घेणार आहे. लेक ईशाबरोबर अरुंधतीला कॉलेडमध्ये जाताना पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्साही आहेत.
अरुंधतीनं कॉलेजमध्ये अँडमिशन घेतल्यानंतर आता ईशा आणि घरचे काय प्रतिक्रिया देणार? अरुंधतीचं कॉलेज लाईफ कसं असणार? हे पाहणं येत्या भागात इंट्रेस्टिंग ठरेल.
आई कुठे काय करते मालिकेतील या रंजक कथानकामुळे या आठवड्यातही मालिका टीआरपीच्या रांगेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. रंग माझा वेगळा आणि आई कुठे काय करते मालिकेत चांगलीच चढा ओढ पाहायला मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.