मुंबई, 04 जुलै: झी मराठीवरील
( Zee Marathi) देवमाणूस 2
( Devmanus 2) ही मालिकेची कथा सध्या चांगलीच रंगली आहे. मालिकेनं पहिल्या सीझनपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. आजवर अनेकांनी अजित कुमारला अडकवण्याचा प्रयत्न केला मात्र अजित कुमारनं देवमाणूस बनून सगळ्यांचा गेम फत्ते केला. मात्र इंस्पेक्टर जामकरच्या एंट्रीनंतर अजित कुमार चांगलाच अडचणीत आला आहे. दिवसेंदिवस जामकरच्या जाळ्यात अजित कुमार अडकताना दिसत आहे. देवमाणूस मालिकेत जामकर आणि देवयानीच्या एंट्री नंतर हि मालिका विलक्षण वळणावर आली आहे. दोघांची एंट्री नंतर आता मालिकेत जामकरची पत्नी एंट्री घेणार आहे. जामकरची पत्नी मध्येच मालिकेत का येणार असा प्रश्न आता सर्वांना पडला असेल मात्र याच उत्तर देवमाणूस मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहे.
मालिकेच्या आतापर्यंतच्या भागात आपण पाहिलं की जामकरने अजितकुमारला पुरता अडकवलं आहे. त्याला गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात अडकण्याचा निश्चय जामकरने केला आहे. त्यासाठी लागणार सर्व तपास जामकर करतोय. आता या मालिकेत जामकरच्या पत्नीची एंट्री मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.जामकरच्या पत्नीची भूमिका 'चला हवा येऊ द्या'ची ब्लॅक ब्युटी म्हणून प्रसिद्ध असलेली टॅलेंटेड अभिनेत्री स्नेहल शिदम
( Snehal Shidam) साकारणार आहे. स्नेहल शिदम जामकरच्या बायकोची भूमिकेत आहे म्हणजे तिची भूमिका दमदारचं असणार यात काही शंका नाही. त्यामुळे स्नेहल मालिकेत आता काय धम्माल उडवून देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
हेही वाचा -
गौरी झाली शिर्केपाटलांच्या घरची खरी मालकीण! मिळाला सिंहासनावर बसण्याचा मान; आता काय करणार शालिनी ?
त्याचप्रमाणे देवमाणूस मालिकेत स्नेहल एंट्री करणार असल्यानं चला हवा येऊ द्याला ती फुलस्टॉप देणार का? असा प्रश्न आता पडला आहे. चला हवा येऊ द्या मधून शितल महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मात्र देवमाणूस मालिकेसाठी शितल चला हवा येऊ द्या ही शो सोडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
जामकरच्या पत्नीच्या एंट्रीनंतर मालिकेला काय वळण येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. मात्र त्या आधी स्नेहलनं तिच्या भूमिकेविषयी सांगताना मालिकेचं कौतुक केलं आहे. ती म्हणाली, 'देवमाणूस हि मालिका माझी आवडती आहे. या मालिकेत एखादी भूमिका करण्याची इच्छा मला होती पण ती इच्छा आता पूर्ण होतेय. एका महत्वपूर्ण वळणावर मालिकेत जामकरच्या पत्नीच्या भूमिकेत मी एंट्री करणार आहे. ही भूमिका प्रेक्षकांना आवडेल अशी मी अशा करते'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.