मुंबई, 04 जुलै: स्टार प्रवाहवरील ( Star Pravah) सुख म्हणजे नक्की काय असतं ( Sukh Mhanje Nakki Kay Asat) ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या सर्वाधिक पसंतसी पडलेली मालिका आहे. टिआरपीच्या शर्यतीत सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका टॉप वनवर आहे. मालिकेत सध्या सुरू असलेला ट्रॅक प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडलेला दिसतो. अम्मानं जयदीपच्या जन्माचं सत्या सर्वांना सांगितल्यानंतर शिर्केपाटलांच्या घरात नवीन घडामोडी घडल्या आहेत. जयदीप नाही तर गौरीचं माई आणि दादांची खरी मुलगी असल्याचं समजताच सर्वच जण आश्चर्य चकीत झाले आहेत. जयदीपकडे शिर्केपाटलांचे असलेले सगळे हक्क काढून आता गौरीच्या नावे करण्यात येणार आहेत. मालिकेच्या येत्या भागात गौरीला शिर्केपाटलांच्या खऱ्या मालकीणीचा मान मिळणार आहे. त्यामुळे येणारा भाग पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात गौरीला शिर्केपाटलांच्या थानदानी सिंहासनावर बसवण्यात येणार आहे. माई स्वत: त्यांच्या लेकीला तिचा मान मिळवून देणार आहेत. मालिकेच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याप्रमाणे माई जयदीपकडून सगळे हक्क काढून घेतात. शिर्केपाटलांच्या घरी गौरीचं नव्यानं स्वागत करण्यासाठी फुलांच्या पायघड्या घालून तिला घरी घेऊन येतात. ‘तुच आहेस शिर्के पाटलांच्या घराची खरी मालकीण’, असं म्हणतं माई आणि दादा गौरीला सिंहासनावर बसवतात. आजपासून गौरी या घराची मालकीण आहे अशी घोषणा माई करतात.
हेही वाचा - Sai Tujha Lekaru: दगडूच्या स्वॅगचा पुन्हा एकदा कल्ला, Timepass3 चं पहिलं गाणं रिलीज
ज्या घरात आपण मोलकरीण म्हणून राहिलो त्या घराची आपण मालकीण झाल्यानं गौरीला अश्रू अनावर होतात. तर दुसरीकडे शालिनी आणि देवकीचा मात्र संताप होत असतो. तेव्हा जयदीप शालिनी आणि देवकीला खडेबोल सुनावत ‘तुम्ही ज्या गौरीला मोलकरीण म्हणून हिणवलं तिचं आज या घराची मालकीण बनून सिंहासनावर बसली आहे’, असं म्हणतो.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत आलेला मोठा ट्विस्ट मालिकेला वेगळं वळणं देऊन गेला आहे. या नंतर मालिकेत अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. गौरी घराती मालकीण झाल्यानं आता शालिनी तिच्यापासून कशी वाचणार ? गौरीच्या हाताखाली शालिनी तिचं नावं मिरवण्यासाठी काय नवीन खेळी खेळणार? याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. त्याचप्रमाणे घराची मालकीण बनलेली गौरी आता घरासाठी काय निर्णय घेणार? गौरी घराची मालकीण झाल्यानं जयदीप आणि गौरी यांच्या नात्यावर काही परिणाम होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.