जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / जेसीबीसह तरुण 30 फूट खोल विहिरीत कोसळला

जेसीबीसह तरुण 30 फूट खोल विहिरीत कोसळला

जेसीबीसह तरुण 30 फूट खोल विहिरीत कोसळला

विहिरीत पडलेल्या जेसीबी आणि त्यामध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी इतर जेसीबीच्या माध्यमातून प्रयत्न केला.

  • -MIN READ
  • Last Updated :

किरण मोहिते, प्रतिनिधी सातारा, 20 मे : शेतामध्ये गाळ काढत असताना जेसीबी मशीनसह तरुण 30 फूट खोल विहिरीत कोसळल्याची घटना सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे. विहिरीमध्ये पाणी असल्याने या तरुणाचा बुडून जागीच मृत्यू झाला आहे. माण तालुक्यातील बिदाल गावात ही घटना घडली. आज सकाळी वैभव मुळीक नावाचा तरुण जेसीबी मशीनच्या सहाय्याने विहिरीतील गाळ काढण्याचं काम करत होता. विहिरीच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ केल्यानंतर विहिरीतील गाळ काढण्यास सुरुवात केली. हेही वाचा - ‘मुंबईतल्या या हॉस्पिटलची चौकशी करा नाहीतर मंत्रालयासमोर आत्मदहन करणार’ पण अचानक जेसीबी विहिरीत कोसळला. जेसीबीच्या केबीनमध्ये हा तरुण अडकून पडला आणि जेसीबीसह विहिरीच्या गाळात अडकून गेला. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला पण यात त्याला यश मिळाले नाही. 30 फूट खोल विहिरीमध्ये पाणी असल्याने चालकाचा बुडून जागीच मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना समजताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. विहिरीत पडलेल्या जेसीबी आणि त्यामध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी इतर जेसीबीच्या माध्यमातून प्रयत्न केला. परंतु, चालकाला वाचवणाऱ्या नागरिकांना आणि पोलिसांना यश आले नाही. जेसीबी चालकाच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात