Home /News /mumbai /

‘मुंबईतल्या या हॉस्पिटलची चौकशी करा नाहीतर मंत्रालयासमोर आत्मदहन करणार’

‘मुंबईतल्या या हॉस्पिटलची चौकशी करा नाहीतर मंत्रालयासमोर आत्मदहन करणार’

हा ई मेल कुठल्या उद्देशाने केला याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत त्यांच्याकडे काही ठोस माहिती आहे की खोडसाळपणा ?

मुंबई 20 मे: मुंबईतली सगळी सरकारी यंत्रणा कोरोनाविरुद्ध लढत असताना आज KEM हॉस्पिटला आलेल्या एका ईमेलने खळबळ उडाली आहे. मुंबईतल्या KEM हॉस्पिटलची चौकशी करा नाहीतर 21 मेला म्हणजेच गुरुवारी मुंबईत मंत्रालयासमोर आत्महदन करणार असल्याचा इशारा पुण्याच्या निकेश निकम यांनी दिलाय. या मेलमध्ये त्यांनी हॉस्पिटलवर अनेक आरोपही केले आहेत. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांवर योग्य उपचार होत नाहीत. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने केला आहे. हॉस्पिटल प्रशासनाने हा ई मेल पुढील तपासासाठी पाठवला आहे. चौकशी होईपर्यंत हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांचं निलंबन करावं अशी मागणीही त्यांनी केलीय. हा ई मेल कुठल्या उद्देशाने केला याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबत त्यांच्याकडे काही ठोस माहिती आहे की खोडसाळपणा करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करण्यात आले आहेत का याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान,  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. राज्यातील पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून या परिस्थितीत कर्तृव्य पार पाडत आहे. पोलिसांवर पडलेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात ड्युटी लागणार आहे. टीका करण्यापेक्षा मोदींकडे मदतीसाठी बोला,राष्ट्रवादी नेत्याचा फडणवीसांना टोला लाॅकडाउनच्या बंदोबस्तात पोलीस कर्मचारी कमी पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रालयातील कर्मचारी हे महाराष्ट्रातून परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनेत काम करणार आहे. राज्य सरकारच्या वतीने यासंदर्भात शासकीय आदेश जारी करण्यात आलेला आहे. राज्य सरकारच्या या आदेशामुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. राज्यात कोरोना विषाणूची प्रादुर्भाव अधिक वाढत आहे. राज्यातील तब्बल बाराशेपेक्षा जास्त पोलीस यंत्रणेतील कर्मचारी या विषाणूचा संकटात अडकले आहेत. अशा परिस्थितीमध्ये परप्रांतीय कामगारांना परत त्यांच्या मुळगावी पाठवण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत करावी लागणार आहे. त्यासाठी मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. जुळ्या बहिणी...एकत्र राहूनही एक कोरोना संक्रमित तर दुसरी ठणठणीत; डॉक्टरही हैराण मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती पोलीस स्टेशनमध्ये काम करण्यासाठी करण्यात येणार आहे. त्याच अनुषंगाने राज्यात जवळपास दीड हजार कर्मचारी वर्ग पोलिसांच्या मदतीला येतील असा साधारण अंदाज आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

पुढील बातम्या