मुंबई, 16 फेब्रुवारी: स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ॲमेझॉनवर चांगली संधी आहे. शाओमी (Xiaomi) कंपनीचा 6000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन (Smartphone) ॲमेझॉनवर रेडमी 9 पॉवर (Redmi 9 Power) स्मार्टफोनवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. तर फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, जर एखाद्या ग्राहकाकडे ICICI बँकेचे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल, तर पेमेंट केल्यावर त्याला 1000 रुपयांची सूट मिळेल. या सेलमध्ये रेडमी 9 पॉवर स्मार्टफोन 10,999 रुपयांना मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB64GB स्टोरेज आहे.
रेडमी 9 पॉवर स्मार्टफोनला 6.53 इंची फुल HDडॉट नॉट डिस्प्ले देण्यात आलाय. हा स्मार्टफोन लेटेस्ट MIUI 12 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असून तो नोट 9, 4G चा रीबॅज्ड व्हर्जन आहे. हा स्मार्टफोन मागील महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल नॅनो सिम पोर्ट मिळतील. हा स्मार्टफोन Android 10वर आधारीत आहे.
कमी किमतीत 6000mAh बॅटरी -
या स्मार्टफोनच्या मागच्या बाजूला तीन कॅमेरे आहेत. यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, अल्ट्रा वाइड-अँगल लेन्ससोबत 8 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.
यासोबतच सेल्फीसाठी या स्मार्टफोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 4G VoLTE, ड्युअल-बँड Wi-Fi, Bluetooth v5.0, GPS/ A-GPS, infrared (IR) blaster, USB Type-C, आणि 3.5mm चा हेडफोन जॅक देण्यात आला आहे.