मुंबई, 20 नोव्हेंबर : हिवाळ्यात आपल्याला आरोग्यासह त्वचेचीदेखील खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर त्वचा रुक्ष आणि कोरडी दिसू लागते. त्वचेला हिवाळ्या तील नुकसानीपासून वाचवण्यासाठी दालचिनी हा एक उत्तम उपाय आहे. अरोमाथेरपीमध्ये दालचिनीचे आवश्यक तेल वापरले जाते. दालचिनीमध्ये अँटीबैक्टीरियल गुणधर्म असतात जे त्वचेवरील मुरुम आणि पुरळ दूर ठेवतात. दालचिनीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पिगमेंटेशनची समस्या दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहेत. हेल्थलाइनच्या मते, दालचिनीमध्ये पॉलीफेनॉल वनस्पती घटक असतात जे मुक्त रॅडिकल्समुळे खराब झालेल्या त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करतात आणि त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात. दालचिनी वृद्धत्व आणि सुरकुत्या दूर ठेवण्याचे काम करते. याशिवाय चेहऱ्यावरील तपकिरी डागही दालचिनीच्या मदतीने कमी करता येतात. दालचिनी रक्तप्रवाह वाढवते ज्यामुळे त्वचा चमकदार आणि समस्यामुक्त राहते. चला तर मग जाणून घेऊया त्वचेच्यासाठी आपण दालचिनीचा कसा वापर करू शकतो.
Winter Health Tips : हिवाळ्यात त्वचेची चमक आणि आरोग्य दोन्हीही राहील कायम; फक्त या तेलाने करा मसाजअशा प्रकारे स्किन केअरमध्ये वापरा दालचिनी मध आणि दालचिनी मध आणि दालचिनी दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर घटक आहेत. हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असेल किंवा त्वचेतील ओलावा निघून जात असेल तर त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत या दोन्हींचा एकत्रित वापर करून तुम्ही त्वचेची काळजी घेऊ शकता. त्यांचा वापर केल्याने त्वचेत चमक येते आणि पिंपल्सची समस्या दूर राहते. यासाठी दालचिनी पावडर एक चमचा मधात मिसळा आणि काही वेळ त्वचेवर लावूं ठेवा आणि नंतर धुवा.
मीठ आणि दालचिनी त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि चेहरा उजळण्यासाठी दालचिनी पावडरमध्ये थोडे मीठ मिसळा आणि त्यात थोडा मध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. त्याच्या वापराने त्वचा मुलायम होते. तुम्ही स्क्रबर म्हणूनही वापरू शकता. दही आणि दालचिनी चेहऱ्याच्या त्वचेवर टॅनिंग येत असेल तर एक चमचा दालचिनी पावडर घेऊन त्यात प्रत्येकी एक चमचा दही आणि मध मिसळून मिश्रण तयार करा. आता ते चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर स्वच्छ धुवा. चेहऱ्याचे टॅनिंग हळूहळू नाहीसे होईल.
थंडीत छान वाटलं तरी चेहऱ्याची स्कीन होते खराब; गरम पाण्याचे आहेत हे दुष्परिणामखोबरेल तेल किंवा कोरफड आणि दालचिनी जर तुमच्याकडे मध नसेल तर तुम्ही खोबरेल तेल किंवा कोरफडीचा गर वापरू शकता. मात्र याचे मिश्रण बनवताना लक्षात असू द्या की, खोबरेल तेलाचे प्रमाण अर्ध्या चमचेपेक्षा जास्त घेऊ नये आणि एक चतुर्थांश चमचे दालचिनी घ्या.

)







