जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / थंडीत छान वाटलं तरी चेहऱ्याची स्कीन होते खराब; गरम पाण्याचे आहेत हे दुष्परिणाम

थंडीत छान वाटलं तरी चेहऱ्याची स्कीन होते खराब; गरम पाण्याचे आहेत हे दुष्परिणाम

गरम पाण्याने तोंड धुण्याचे दुष्परिणाम

गरम पाण्याने तोंड धुण्याचे दुष्परिणाम

Hot water for skin - थंडीत गरम पाण्याने चेहरा धुतल्याने तुम्हाला आराम वाटू शकतो, परंतु असे नियमित केल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : हिवाळ्याच्या हंगामात बहुतेक लोक गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदेही आहेत, परंतु अनेकांना कदाचित माहीत नसेल की, चेहऱ्यावर गरम पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या पेशी खराब होतात, कारण चेहऱ्याची त्वचा शरीरापेक्षा जास्त संवेदनशील आणि नाजूक असते. थंडीत गरम पाण्याने चेहरा धुतल्याने तुम्हाला आराम वाटू शकतो, परंतु असे नियमित केल्याने त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. गरम पाण्यामुळे चेहरा कोरडा आणि रुक्ष होऊ शकतो, म्हणूनच चेहऱ्याच्या त्वचेवर वापरण्यासाठी पाण्याचे योग्य तापमान जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. गरम पाण्याने चेहरा धुण्याचे तोटे: गरम पाण्यामुळे त्वचेला त्रास होतो - आरोग्य साइट डॉट कॉमच्या माहितीनुसार, संपूर्ण शरीरात चेहऱ्याची त्वचा ही सर्वात नाजूक आणि संवेदनशील असते. ज्यामध्ये चेहऱ्याच्या त्वचेखाली रक्तवाहिन्या आणि पेशी आणि छिद्र असतात. जास्त गरम पाणी वापरल्याने चेहऱ्याच्या पेशींना नुकसान होण्याचा धोका असतो. यामुळे त्वचेवर जळजळ-दाह होऊ शकतो किंवा चेहऱ्यावर लालसरपणा आणि पुरळ येण्याची समस्या उद्भवू शकते. त्वचा कोरडी होणे - तज्ज्ञांच्या मते, कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुतल्याने तुमच्या त्वचेतील आवश्यक नैसर्गिक ऑईल निघून जाऊ शकते, ज्यामुळे त्वचा कोरडी होऊन त्यावर भेगा पडू शकतात. गरम पाण्याने चेहऱ्याला रिलॅक्स वाटत असले तरी त्यामुळे त्वचेचे अनेक नुकसान होऊ शकते.

News18लोकमत
News18लोकमत

त्वचेचे अकाली वृद्धत्व - नियमितपणे गरम पाण्याने चेहरा धुतल्याने त्वचेला अनेक समस्या उद्भवू शकतात, कारण गरम पाण्याचा वापर केल्याने कोलेजन आणि सेबम कमी होण्यास सुरुवात होते. त्यामुळे त्वचा खराब होऊन लवकर वृद्ध दिसू लागते. हे वाचा -  हिवाळ्यात जास्त आळस का येतो? थंडीतही अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी करा हे उपाय एकंदरी थंडीच्या दिवसात आरामदायी वाटण्यासाठी तुम्ही अगदी कोमट पाणी वापरू शकता. योग्य आणि सुरक्षित तापमान जाणून घेण्यासाठी थेट तोंडावर पाणी ओतण्यापूर्वी ते हातावर ठेवून ते तपासू घ्यावे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात