मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुंबईत धक्कादायक प्रकार, पत्नीने पतीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी, कारण....

मुंबईत धक्कादायक प्रकार, पत्नीने पतीच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी, कारण....

पीडित ए.ए. दळवी गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

पीडित ए.ए. दळवी गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

पीडित ए.ए. दळवी गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली.

  • Published by:  Manoj Khandekar
मुंबई, 14 मे : पती-पत्नी म्हटलं की थोडाफार वाद आलाच. पण मुंबईत भांडणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 65 वर्षीय व्यक्तीने आपल्या 62 वर्षीय पत्नीविरूद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पत्नीने भांडणात अंगावर उकळतं पाणी टाकलं असल्याचं या तक्रारीमध्ये सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ए.ए. दळवी गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेत पत्नीविरोधात तक्रार दाखल केली. दळवी आणि त्यांची पत्नी शैनाझ हे बोरिवली वेस्टमधील ओल्ड एमएचबी कॉलनीचे रहिवासी आहेत. दळवी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यात आणि शैनाझमध्ये वारंवार क्षुल्लक कारणांवरून वाद व्हायचा. दळवी म्हणाले की, शैनाझ नेहमी भांडणाला सुरुवात करायची आणि मारण्याची धमकी द्यायची. याच वादामुळे काही वर्षांआधी त्यांचा मुलगा घर सोडून गेल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. धक्कादायक! या एका निर्णयामुळे अख्ख्या कोकणात कोरोना पसरण्याची भीती या दोघांमध्ये सतत वाद होत असतात असं शेजाऱ्यांनीही म्हटलं आहे. दळवी यांच्या तक्रारीनुसार, 07 मे रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शैनाझ त्यांच्यावर ओरडू लागली. जेव्हा ते हॉलमध्ये झोपले होते. दळवी त्यांच्या बेडरूमऐवजी हॉलमध्ये झोपले म्हणून शैनाझला खूप राग आला आणि तिने शिवीगाळ करत भांडण करण्यास सुरुवात केली. जेव्हा शैनाझ यांनी अतिशय घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा दळवी तिला थांबवण्यासाठी स्वयंपाक घरात गेले. जेव्हा दळवी यांनी तिला आरडाओरड थांबवण्यास सांगितलं, तेव्हा तिचा राग आणखी वाढला आणि तिने प्रेशर कुकरमधलं उकळतं पाणी दळवी यांच्या अंगावर फेकलं. गरम, उकळत्या पाण्यामुळे दळवी यांची छाती, घसा आणि हात जळाला. त्यांना तातडीने कांदिवलीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यानंतर त्यांना कूपर रुग्णालयात हलवण्यात आलं. OMG! इंडियन Mr. Bean; तुम्ही हे व्हिडीओ पाहिलेत की नाही? दळवी हे तीन दिवस रुग्णालयात होते. त्यानंतर रविवारी त्यांनी पत्नीविरुध्द पोलिसांत तक्रार दाखल झाली. यानंतर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत असून शैनाझवर कारवाई करण्यात येणार आहे.
First published:

पुढील बातम्या