जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / काळजाचं पाणी करणारी घटना, पतीच्या मृतदेहाशेजारीच रडताना पत्नीनेही सोडला प्राण

काळजाचं पाणी करणारी घटना, पतीच्या मृतदेहाशेजारीच रडताना पत्नीनेही सोडला प्राण

काळजाचं पाणी करणारी घटना, पतीच्या मृतदेहाशेजारीच रडताना पत्नीनेही सोडला प्राण

ज्याच्यासोबत आपलं आयुष्य घालवलं, ज्याच्यासोबत संसार केला, सगळी सुख-दुख ऐकमेकांच्या सोबत घालवी अशा पतीच्या मृतदेहाशेजारीच रडताना पत्नीचेही प्राण गेल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोल्हापूर, 26 ऑगस्ट : जन्म आणि मृत्यू अटळ आहे. जन्म आपल्या हातात असला तरी मृत्यू कोणच्याही हातात नाही. त्यामुळे कोणाचा कधी आणि कसा मृत्यू होईल याबद्दल काही सांगू नाही शकत. पण ज्याच्यासोबत आपलं आयुष्य घालवलं, ज्याच्यासोबत संसार केला, सगळी सुख-दुख ऐकमेकांच्या सोबत घालवी अशा पतीच्या मृतदेहाशेजारीच रडताना पत्नीचेही प्राण गेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं आहे. कोल्हापूरच्या सांगवडेवाडी इथली ही धक्कादायक घटना आहे. हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने गुलाब सहदेव कांबळे (वय 77) यांचे निधन झाले. पतीच्या जाण्याचा लक्ष्मी कांबळे यांना मोठा धक्का बसला. पतीचा मृतदेह पाहून लक्ष्मी यांच्या पायाखालची जमीन हादरली. त्यांना ऐवढा मोठा धक्का बसला की, अवघ्या 1 तासात लक्ष्मी यांनी पतीच्या मृतदेहासमोरच आपला जीव सोडला. बँक खात्यातून फसवणुकीने पैसे काढण्यात आले आहेत? हे काम केल्यास मिळेल पूर्ण रक्कम पतीच्या मृतदेहासमोर बसून आक्रोश करत असतानाच ही घटना घडली. या सगळा प्रकार पाहिल्यानंतर कुटुंबालाही मोठा धक्का बसला. दोघेही पती-पत्नी शांत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या मुलांचे लहान असतानाच निधन झाल्याने सध्या ते दोघेच घरी राहत होते. अशा दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळाच पसरली आहे. मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे जाणार का? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी गुलाब हे पूर्वी शाहू मीलमध्ये नोकरी करत होते. त्यांचा अपघात झाल्यामुळे नोकरी सोडून ते शेती करत होते. पण अखेर इतक्या दिवसांचा संसार थांबला आणि कांबळे जोडप्याचा एकाच वेळी मृत्यू झाला. त्यांच्या अशा जाण्यामुळे सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात