नवी दिल्ली, 27 मे : देशात कोरोनाव्हायरसची (coronavirus) प्रकरणं दिवसेंदिवस वाढत आहेत. नवीन प्रकरणं येत असल्यानं सरकारी रुग्णालयातील भार वाढतो आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांची (Private hopsital) मदत घेण्याचा विचार केला जातो आहे. मात्र खासगी रुग्णालयातील उपचार परवडणारे नाहीत, प्रत्येक रुग्णाला तितके पैसे देणं शक्य नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेत सुप्रीम कोर्टाने (supreme court) यामध्ये लक्ष घातलं आहे. खासगी रुग्णालयं कोरोना रुग्णांवर मोफत उपचार (free treatment) का करू शकत नाही? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांसंबंधात माहिती मागितली आहे.जर खासगी रुग्णालयं रुग्णांवर मोफत उपचार करू शकत नाही तर सरकारने या रुग्णालयांना मोफत जमिनी का दिल्या? असं विचारत सुप्रीम कोर्टाने सरकारलाही धारेवर धरलं आहे. सरन्यायाधीश एस ए बोबडे म्हणाले, “खासगी रुग्णालयांना सरकार मोफत जमीन देतं किंवा मोजकीच किंमत आकारतं. त्यामुळे या रुग्णालयात महासाथीच्या वेळी संक्रमितांवर मोफत उपचार करायला हवेत” हे वाचा - ‘त्या’ डॉक्टरांना मोठा दणका, प्रशासनाने दिले थेट आदेश खासगी रुग्णालयांना मोफत उपचार देण्यात काय समस्या आहे ते सांगावं, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने सरकारला दिलेत. भारतात दिवसेंदिवस कोरोनाची प्रकरणं वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात सध्या 1 लाख 51 हजारहून अधिक रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत भारतात 6387 नवीन रुग्णांची नोंद झाली. सलग दुसऱ्या दिवशी भारतातील रुग्णांची संख्या कमी झालेली पाहायला मिळाली. तर गेल्या 24 तासांत 170 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावरून भारतातील मृत्यू दरही कमी झाल्याचे दिसत आहे. हे वाचा - मुंबईसह पुणे शहर 10 दिवस बंद राहणार, आर्मी तैनात होणार? काय म्हणाले गृहमंत्री दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर काही थांबत नाही आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2091 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर यात 97 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या सर्वात जास्त आहे. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 1002 रुग्णांची नोंद झाली आहे तर 39 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आता एकूण कोरोबाधितांची संख्या 32 हजार 974 झाली आहे. तर, 1065 लोकांचा मृत्यू झाला आहे. संपादन - प्रिया लाड कोरोना लॉकडाऊननंतर आयुष्यात काय बदल होईल असं वाटतं? या प्रश्नांची द्या उत्तरं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.