जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'त्या' डॉक्टरांना मोठा दणका, प्रशासनाने दिले थेट आदेश

'त्या' डॉक्टरांना मोठा दणका, प्रशासनाने दिले थेट आदेश

त्यामुळे रशियाच्या या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे.

त्यामुळे रशियाच्या या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे.

कोविड -19 चा सामना करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महपालिकेनं खासगी रूग्णालय ताब्यात घेतली.

  • -MIN READ
  • Last Updated :

ठाणे, 27 मे :  ठाणे शहरामध्ये कोविड -19 चा सामना करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी महपालिकेनं ताब्यात घेतलेल्या खासगी रूग्णालयातील डॅाक्टर्स, नर्सेस आणि इतर कर्मचारी त्या त्या रूग्णालयांमध्ये कामावर उपस्थित न राहिल्याने संबंधित डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. ठाणे शहरामध्ये कोरोना अर्थात कोविड-19 चा सामना करता यावा आणि रूग्णांवर तातडीने उपचार करता यावेत यासाठी ठाणे महानगरपालिकेच्यावतीने अनेक खासगी रूग्णालय आणि त्यामध्ये काम करणाऱ्या डॅाक्टर्स आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांसह ताब्यात घेतली आहे.  महापालिका प्रशासनाने यापूर्वी तसे आदेशही दिले आहेत. हेही वाचा - खाकी वर्दीतला लाचखोर, अधिकाऱ्याचा प्रताप ऐकून पोलीस दल हैराण परंतु, कौशल्या हॅास्पिटल, होरायझन प्राईम आणि ठाणे हेल्थ केअर सेंटर या रूग्णालयातील डॅाक्टर्स आणि इतर कर्मचारी हे सेवेत हजर झालेले नाहीत. सदरची बाब लक्षात आल्यानंतर या तीनही हॅास्पिटलमधील सेवेत हजर न झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता (45ॲाफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिले आहेत. यासंदर्भात होरायझन प्राईम रूग्णालयासाठी डॅा. अनिता कापडणे, ठाणे हेल्थ केअरसाठी डॉ. शलाका खाडे आणि कौशल्या हॅास्पिटलसाठी डॉ. अश्विनी देशपांडे हे वैद्यकीय अधिकारी प्राधिकृत करण्यात आले आहेत. संपादन - सचिन साळवे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात