मराठी बातम्या /बातम्या /देश /

भूतदयेचा अंत! पोस्टमननं कुत्र्याला बेदम मारलं, बेशुद्ध झाल्यानंतरही मारत राहिला, FIR दाखल

भूतदयेचा अंत! पोस्टमननं कुत्र्याला बेदम मारलं, बेशुद्ध झाल्यानंतरही मारत राहिला, FIR दाखल

Viral News: पोलिस अधिकारी रमाकांत ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस या प्रकरणी तपास करत असून, पोस्टमनच्या विरोधात प्राण्याबरोबर क्रूर वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

ऊना, 08 जून : सध्याच्या काळामध्ये नेमकं माणूस कोण आणि प्राणी (Animal)कोण असा प्रश्न विचारावासा वाटावा अशा घटना समोर येत आहेत मानवाचे प्राण्यांवर एकापेक्षा एक गंभीर असे अत्याचार समोर येत आहेत. हिमाचल प्रदेशच्या ऊना (Una) जिल्ह्यातही असाच एक प्रकार घडला आहे. याठिकाणी एका तरुणानं कुत्र्याला बेदम मारहाण केल्याचं समोर आलं. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी (Police) आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

(वाचा-दिवस पलटले! वाचा रातोरात लोकप्रिय झालेल्या 'बाबा का ढाबा'ची आता काय आहे अवस्था)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ऊनाच्या बंगाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका कुत्र्याला काठीने प्रचंड मारहाण करणाऱ्या, एका पोस्टमनच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या पोस्टमनचं नाव दीपक राठी असून तो हरियाणाच्या भिवानी येथील रहिवासी आहे. काही दिवसांपासून तो बंगाणामधील के कोहडरा पोस्टऑफिसमध्ये काम करत आहे. त्यानं कुत्र्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तरुण म्हणतोय की, कुत्रा त्याला चावत होता, त्यामुळं त्यानं त्याला मारलं.

(वाचा-VIDEO: लोकांना उपदेश अन् पत्नीला अमानुष मारहाण, कीर्तनकार पतीविरोधात गुन्हा)

कुणी केली तक्रार

पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीमध्ये कोहडरा येथील अरविंद कपिला यांनी सांगितलं की, 4 जून रोजी दुपारी ते त्यांच्या गाडीत लठियाणी याठिकाणी आले तेव्हा त्यांनी एक तरुण रस्त्याच्या कडेला कुत्र्याला प्रचंड मारत असल्याचं त्यांनी पाहिलं. तो तरुण कुत्र्याला काठीनं मारत होता. अरविंद यांनी सांगितलं की, कुत्रा यामुळं बेशुद्ध झाला होता. मात्र त्यानंतरही हा तरुण त्याला मारहाण करतच होता.

तरुणाला त्यांनी अनेकदा अडवलं, पण तरुणानं त्यांचं काहीही ऐकलं नाही. त्यांच्या बोलण्याकडं तरुणानं दुर्लक्ष करत त्या कुत्र्याला तो मारतच राहिला. पोलिस अधिकारी रमाकांत ठाकुर यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस या प्रकरणी तपास करत असून, पोस्टमनच्या विरोधात प्राण्याबरोबर क्रूर वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Himachal pradesh, Shocking viral video, Viral video.