मुंबई, 21 मे : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असताना 21 ते 24 दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे तर काही भागांत 22 आणि 23 मे रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत, फरीदाबाद, गुडगाव, मेरठ, बहुतेक ठिकाणी हवामान स्वच्छ राहील. यावेळी उष्णता देखील वाढेल. दिल्लीसह बर्याच ठिकाणी बुधवारी तापमान 44 अंशांवर पोहोचलं आहे.
कोरोना विषाणूचा सगळ्यात जास्त कहर असलेल्या मुंबईमध्ये पुढचे 7 दिवस ढगाळ वातावरण असणार आहे. संपूर्ण आठवड्यात जास्तीत जास्त तापमान 31 अंशांपर्यंत राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात उष्णता वाढत आहे. काही भागात तापमान 40 अंशांच्या आसपास तापमना गेलं आहे. हवामानशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की 3 ते 4 दिवसांत उष्णता वाढेल. परंतु, येत्या 24 तासांत हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, पंजाब, मध्य महाराष्ट्र, अंतर्गत ओडिशा, पूर्व झारखंड आणि पूर्व बिहारच्या काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि किनारपट्टीवरील कर्नाटकात पावसाचे काम कमी होईल, परंतु काही ठिकाणी जोरदार सरी बरसत राहतील.
छगन भुजबळांचा मतदारसंघ झाला कोरोनामुक्त, नागरिक आणि शासकिय यंत्रणेनं असं जिंकलं युद्ध
हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार मान्सून वेळेत केरळमध्ये येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण पश्चिम मान्सून अंदमान आणि केरळपासून दाखल होत मग पुढे उत्तर भारतात त्याचा प्रवास सुरु होतो. दक्षित पश्चिम मान्सून अंदमान समुद्रासह जवळपासच्या परिसरात दाखल झाला आहे. केरळमध्ये 5 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल तर महाराष्ट्रात 11 जूनपर्यंत येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मान्सूनचा सध्याचा प्रवास पाहता हवामान विभागाच्या अंदाजानुसार वेळेत दाखल होईल असं सांगण्यात येत आहे.
केरळमध्ये मान्सून वेळेत दाखल झाला तर उर्वरीत भारतातही मान्सूनचं वेळेत आगमन होतं. त्यावर पिकांची पेरणी त्यावर अवलंबून असते. शेतकऱ्यांसह सर्वजण मान्सूनची चातकासारखी वाट पाहात असतात. हवामान खात्यानं 1961 ते 2019 दरम्यान 58 वर्षांच्या मान्सूनचा अभ्यास केला. त्यानुसार परतीच्या प्रवासावर त्याचं आगमन आणि प्रवास यात गेल्या काही वर्षात सातत्यानं बदल होत आहेत.
अम्फाननंतर पावसाचा फटका; एअरपोर्टचं झालं तलाव, पाण्यात बुडाली विमानं
दिल्लीमध्ये मान्सून 23 जून ऐवजी 27 जून रोजी दाखल होईल तर मुंबईमध्ये 10 जून ऐवजी 11 ला दाखल होणार होता त्याऐवजी तो पुढे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुर्तास नियोजित ज्या तारीख हवामान खात्याच्या मान्सून प्रवास जाहीर केल्या त्यानुसार मान्सून प्रवास सुरू आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून पाऊस सामान्य होईल. त्यानुसार 2020 मध्ये मान्सून सरासरीच्या 100 टक्के म्हणजे चांगला होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.