Home /News /maharashtra /

छगन भुजबळांचा मतदारसंघ झाला कोरोनामुक्त, नागरिक आणि शासकिय यंत्रणेनं असं जिंकलं युद्ध

छगन भुजबळांचा मतदारसंघ झाला कोरोनामुक्त, नागरिक आणि शासकिय यंत्रणेनं असं जिंकलं युद्ध

24 मार्चला येवल्या पहिली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

येवला, 21 मे : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असताना एकीकडे नाशिकमधील लासलगाव पाठोपाठ येवला तालुकासुद्धा कोरोनामुक्त झाला आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेला येवला कोरोनामुक्त झाला असून सर्व 34 रुग्णांनी कोरोनावर मात करत बरे होऊन घरी आले आहेत. त्यामुळे शासकीय यंत्रणांसोबत येवला परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला येवल्या पहिली महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली. त्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. अशात तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 34 पर्यंत पोहोचला होता. अशा परिस्थितीत ZP मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची विशेष घटक व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली गेली. नागरिक आणि शासकीय यंत्रणा मोठ्या हिम्मतीनं कामाला लागली. तालुक्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता सर्व रस्ते बंद करण्यात आले. येवल्या कोणालाही येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली. छोट्यातली छोटी गल्ली नागरिकांनी स्वत: बंद केली. त्यामुळे लोकांना विनाकारण बाहेर वावर कमी झाला. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेला मोठं यश आलं. PHOTOS: अम्फाननंतर पावसाचा फटका; एअरपोर्टच झालं तलाव, पाण्यात बुडाली विमानं शासकीय यंत्रणेनं तत्काळ कॉन्टॅक्ट शोधून लोकांना क्वारंटाईन केलं. त्याचा खूप मोठा फायदा लोकांना झाला. अखेर 14 दिवसांच्या लढाईनंतर सर्व पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह आले. येवल्यातील कोरोना रुग्णांवर नाशिकच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या सर्व रुग्णांना आता डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांसारखा नेता स्वतःला 'मातोश्री'मध्ये कोंडून घेत असेल तर, भाजपची टीका दरम्यान, लासलगाव आणि येवला तालुका कोरोनामुक्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण असलं तरी अद्यापही नियमांचं कठोर पालन सुरू आहे. त्यामुळे पुन्हा कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी नागरिकांनीही खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या