धक्कादायक! ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांवर चाकूनं सपासप वार

धक्कादायक! ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसांवर चाकूनं सपासप वार

भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाच्या पाठीत खुपसला सुरा.

  • Share this:

भिवंडी, 02 ऑगस्ट : कोरोनाच्या काऴात सर्वात जास्त आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची मदत करण्यासाठी आणि संरक्षणासाठी पुढे आले ते पोलीस. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे राज्यासह देशात साजरे होणारे सण यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. शनिवारी देशभरात बकरी ईद सण साजरा होत असतानाच भिवंडीत एक भयंकर घटना घडली.

भिवंडी शहरातील टावरे कंपाउंड इथे रात्री दोन जणांमधील वाद झालेला वाद सोडवत असतानाच पोलिसावर वार करण्यात आले. धक्कादायक बाबा म्हणजे ड्युटीवर तैनात असलेल्या पोलिसानं या दोघांनाही समजवलं तरुणानं अरेरावीची भाषा करत पोलिसावरच धारदार शस्त्रानं वार केले. या घटनेत पोलीस गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचा-मास्क आणि सॅनिटायजर किमतीच्या नियंत्रणासाठीची सरकारने उचललं पाऊल

भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत  ड्युटीवर  असलेल्या पोलिसाने  त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामधील एकाने  वर्दीमध्ये  असलेल्या पोलिसाच्या हातावर, पाठीवर चाकूने सपासप वार करून जखमी करून तरुणानं पळ काढली. स्थानिकांनी जखमी झालेल्या  पोलिसाला रुग्णालयात दाखल केले असून जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव प्रफुल्ल दळवी (52) आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या अज्ञात आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 2, 2020, 7:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या